Women’s Asia Cup 2024 : शेफाली वर्माची स्फोटक खेळी, भारताचे नेपाळसमोर 179 धावांचे लक्ष्य…

Women’s Asia Cup 2024 (IND vs NEP, Score Update) : महिला आशिया चषक 2024 चा 10 वा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला जात आहे. भारताने हा सामना जिंकला तर संघ थेट उपांत्य फेरी गाठेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 178 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.
शेफाली वर्मा आणि दयालन हेमलता यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी झाली. हेमलता 42 चेंडूत 47 धावा करून बाद झाली. त्याचवेळी शेफालीने 26 चेंडूत चालू स्पर्धेतील तिचे दुसरे अर्धशतक झळकावले. 48 चेंडूत 81 धावा करून ती बाद झाली. यादरम्यान तिने 12 चौकार आणि एक षटकार लगावला.
Innings Break!#TeamIndia set a 🎯 of 179 runs
8⃣1⃣ from @TheShafaliVerma 💪
4⃣7⃣ from Dayalan Hemalatha 👌Over to our bowlers 🙌
Scorecard ▶️ https://t.co/PeRykFLdTV#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvNEP pic.twitter.com/wSVFwk55AX
— BCCI Women (@BCCIWomen) July 23, 2024
या सामन्यात भारताला तिसरा धक्का सजीवन सजनाच्या रूपाने बसला. तिला कविता जोशीने एलबीडब्ल्यू आऊट केले. तिला फक्त 10 धावा करता आल्या. हेमलता आणि शेफाली बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा रनरेट मंदावला. 16व्या आणि 17व्या षटकात फक्त 12 धावा झाल्या. पण शेवटच्या 3 षटकात भारताने 35 धावा केल्या आणि त्यांचा डाव 178 धावांवर संपुष्टात आला. यादरम्यान जेमिमा आणि रिचा या अनुक्रमे 28 आणि सहा धावा करून नाबाद राहिल्या.
दुसरीकडे नेपाळकडून सीता राणा मगरने सर्वाधिक विकेट घेतल्या, तिने 4 षटकात 25 धावा देत 2 बळी घेतले. तर कविता जोशीने एक विकेट घेतली, मात्र तिने यासाठी 4 षटकात 36 धावा दिल्या.





