Women’s Asia Cup 2024 : चमारी अटापट्टूने रचला इतिहास, शतकी खेळीसह ‘या’ भारतीय खेळाडूचा विक्रमही काढला मोडीत…

Women’s Asia Cup 2024 (Chamari Athapaththu) : श्रीलंका महिला क्रिकेट संघाची दिग्गज फलंदाज आणि कर्णधार चमारी अटापट्टूने इतिहास रचला आहे. महिला टी-20 आशिया कपच्या इतिहासात शतक झळकावणारी ती पहिली फलंदाज ठरली आहे. तिने भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडीत काढला आहे. टी-20 आशिया चषक स्पर्धेत ती आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी खेळणारी फलंदाज होती, मात्र आता हा विक्रम चमारी अटापट्टूच्या नावावर नोंदवला गेला आहे. मलेशियाविरुद्धच्या सामन्यात तिने झंझावाती शतक झळकावले आहे.
💥CENTURY!💥
The Captain leads from the front! Chamari Athapaththu blasts her way to a magnificent 3️⃣rd T20I century! 🔥#WomensAsiaCup2024 #SLvMAL #GoLionesses pic.twitter.com/tegzguOUFx
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 22, 2024
चामारी अटापट्टूने टी-20 आशिया कप 2024 च्या ग्रुप बी सामन्यात मलेशियाविरुद्ध 63 चेंडूत शतक पूर्ण केले. या सामन्यात 69 चेंडूत नाबाद 119 धावा करण्यात ती यशस्वी ठरली. टी-20 आशिया कपच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे, कारण आतापर्यंत एकाही फलंदाजाने शतकही झळकावले नव्हते. मिताली राजने 2018 मध्ये मलेशियाविरुद्ध 97 धावांची नाबाद इनिंग खेळली होती. त्याच वेळी, या यादीत तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेची हर्षिता समरविक्रमा आहे, जिने 2022 टी-20 आशिया कप सामन्यात थायलंडविरुद्ध 81 धावांची इनिंग खेळली होती.
डावखुरी फलंदाज चमारी अटापट्टू हिच्या नावावर आधीच अनेक विक्रम आहेत. ती श्रीलंकेच्या संघाची वन मॅन आर्मीसारखी आहे. तीने एकट्याच्या हिमतीवर अनेक सामने जिंकून दिले आहेत. खरं तर, ती श्रीलंकेसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 हून अधिक धावा करणारी एकमेव महिला खेळाडू आहे.
Women’s Asia Cup 2024 : पाकच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम, नेपाळचा 9 विकेट्सने केला पराभव…
इतर कोणत्याही फलंदाजाने अद्याप 1500 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. खरं तर, ती श्रीलंकेच्या देशातील एकमेव फलंदाज आहे जिने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. याशिवाय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत.





