Sanjay Gaikwad : बुलढाणा जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या डिफेंडर कारवरून चांगलाचा वाद निर्माण झाला असून, राजकारण तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपांवर शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सत्ताधारी आमदारांना एका ठेकेदाराकडून २१ डिफेंडर गाड्या भेट मिळाल्याचा सनसनाटी आरोप केला होता. या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या आरोपांवर संजय गायकवाड यांनी पलटवार करत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार असताना सपकाळांनी बुलढाणा शहरातील चांगल्या महिलांना एड्स झाल्याचे दाखवून सरकारी अनुदान लाटले असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी सपकाळांवर केला आहे. हेही वाचा : भाजपने बीएमसीसाठी दीडशे पारचा नारा देताच उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर; चर्चांना उधाण आमदारांवर कुणी काय आरोप करत असेल, तर त्यांनी पाहिले सिद्ध केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. बिनबुडाचे आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी, असे स्टेटमेंट हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करत असतो, असा खोचक टोला संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना लगावला. नेमकं काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ? राज्याच्या राजकारणात हर्षवर्धन सपकाळ यांनी दिवाळीच्या सुमारास सत्ताधारी २१ आमदारांना डिफेंडर गाड्या भेट मिळाल्याचा दावा चर्चेत आहे. हा दावा करताना सपकाळांनी यापैकी एक गाडी बुलढाण्यातील असल्याची चर्चा असल्याचे म्हटले होते. सपकाळांनी केलेल्या आरोपांवर संजय गायकवाडांनी प्रत्युत्तर दिले. याशिवाय याची चौकशी करण्याबरोबरच आमदार असताना एड्स अनुदानांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणाचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील जनतेला या 21 आमदारांची आणि भेट देणाऱ्या ठेकेदाराची ओळख लवकरच होईल, असेही संजय गायकवाड म्हणाले. संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर 21 वी की, 22, शोध म्हणाव. तू आमदार असताना बुलढाणा शहरातील चांगल्या चांगल्या घराच्या महिलांचं, तुझ्या एड्स झालेल्या यादीत होत्या. त्याचं अनुदान लाटत होता, त्याचाही शोध घे,’ अशा शब्दांत त्यांनी आरोप केले आहेत. आता या आरोपांवर हर्षवर्धन सपकाळ काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागणार आहे. हेही वाचा : IND vs AUS : ट्रॅव्हिस हेडचा विक्रमी धमाका! स्टीव्ह स्मिथला मागे टाकत रचला नवा इतिहास