Indapur News : “एक पेड मा के नाम..” अभियानांतर्गत महिलांनी इंदापूरात केले वृक्षारोपण

Indapur News : इंदापूर नगर परिषदेच्या वतीने, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व अमृत अभियान आणि माझी वसुधरा अभियान, अंतर्गत शहरातील महिला बचत गटांच्या समवेत, नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी यांनी पालखी तळावरील ठिकाणी शंभर वृक्षांची लागवड यशस्वीपणे केली.
चिंच, वड, कडुलिंब इत्यादी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. जेणेकरून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना सावली मिळावी. तसेच प्रदूषण ही स्वच्छ राहावे. अशी या वृक्ष लागवड करण्यामागची धारणा होती.
यावेळी गौरी महिला बचत गट विनायक महिला बचत गट, रुद्राक्ष महिला बचत गट या गटातील महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. ‘एक पेड मा के नाम..’ या अभियानांतर्गत महिलांनी वृक्षांची लागवड केली. तसेच या वृक्षांची जोपासना करण्याचाही संकल्प महिलांनी केलेला आहे.
नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक स्वप्निल हाके, पाणीपुरवठा व स्वच्छता पर्यवेक्षक श्रीमती रश्मी बारस्कर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुभाष ओहोळ, समुदाय संघटक योगिता सरगर, उद्यान विभाग प्रमुख अशोक चिंचकर, नितीन जगताप, अरुण शिंदे व सफाई कर्मचारी यांनी या वृक्ष लागवडीमध्ये आपला सहभाग नोंदवला.





