Pune News : ससाणेनगर येथे विसर्जनघाटावर राडा; महिला पोलिसाच्या तोंडावर मारला नारळ, ३ जणांवर गुन्हा दाखल
Pune News : एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस अंमलदारावर टोळक्याने दगडफेक करत नारळ फेकून मारल्याची संतापजनक घटना घडली आहे.

Pune News : गणेश विसर्जनासाठी ससाणेनगर येथील कॅनालजवळील घाटावर जमलेल्या गर्दीचे नियंत्रण करत असताना महिला पोलिस अंमलदाराच्या दिशेने दगडफेक तसेच नारळ फेकून मारल्याचा प्रकार घडला. नारळ तोंडावर आदळल्याने महिला पोलिसाचा समोरील एक दात पडला असून खालचे दोन दात हलले आहेत. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती प्रदीप सोनवणे (वय ३६) या काळेपडळ पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. २५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास त्या ससाणेनगर येथील गणपती विसर्जन घाटावर बंदोबस्तासाठी तैनात होत्या. विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने त्या गर्दी नियंत्रणाचे काम करीत होत्या. (Pune News)
यावेळी जितेनसिंग जितेंद्रसिंग टाक (वय २१, रा. नवीन म्हाडा कॉलनी, वानवडी), चिंटूसिंग जितेंद्रसिंग टाक आणि राजवीर दारासिंग भोड यांनी विसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांच्या दिशेने दगडफेक केली. तसेच नारळ जोरात फेकून मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यातील एक नारळ सोनवणे यांच्या तोंडावर आदळला. त्यात त्यांचा समोरील एक दात पडला, तर खालचे दोन दात हलल्याने त्यांना दुखापत झाली. (Pune News)
या घटनेप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत. (Pune News)
Pune News : विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ११ जण अटकेत





