Pune News : विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ११ जण अटकेत
Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका मोठ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या खिशातील मोबाईल चोरी करणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या ११ जणांच्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. (Pune News)
पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांचे तब्बल ६३ महागडे मोबाईल, शेवरलेट क्रुझ कार, चाकू, कटर आणि लाल मिरची पावडर असा एकूण ३० लाख ५७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune News)
जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, झाशीची राणी चौक, पुणे महापालिका परिसर आणि लक्ष्मी रस्ता परिसरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांचे निगराणी पथक गस्त घालत होते.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना खुडे ब्रिजजवळ नदीपात्रालगत सात ते आठ जण हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत थांबल्याची माहिती मिळाली. माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि पथकाने कारवाई केली. (Pune News)
सकाळी सव्वापाचच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अब्दुल कादीर नूर मोहम्मद (२८), अब्दुल मालीक अब्दुल खालीक (२२), जीयाऊ रहेमान ऊर्फ अताऊर रहेमान शौकत हुसेन (२६), मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (३१), फैसल अजीज खान (२४), हुजेफा अंजुम मोहम्मद साजीद अन्सारी (३०), जुबेर अहमद मुख्तार अहमद (३५), अझर अहेमद अल्लाफ अहेमद मोमीन ऊर्फ अन्सारी (३०), नावेद अख्तार शफीक अहमद अन्सारी (३३), अत्तहर अहमद एजाज अहमद (२३) या मालेगाव, नाशिक येथील आरोपींसह अतुल मारोत्ती इंगळे (२४, रा. गिरोली, मनोरा, वाशीम) यांना सकाळी ६.५०च्या सुमारास ताब्यात घेतले. (Pune News)
आरोपींकडून ६३ मोबाईल फोन, एमएच ४३ एबी ९९९० क्रमांकाची शेवरलेट क्रुझ कार, सु-या, कटर आणि लाल मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर नाशिक शहर तसेच नाशिक ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांत शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Pune News)
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (४), ३१० (२), ३०९ (४), शस्त्र अधिनियमाच्या कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत. (Pune News)
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (Pune News)
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मनीषा वलसे, सहायक पोलीस फौजदार प्रदीप खळदकर, पोलीस हवालदार गणेश चोबे, तेजस चोपडे, बिडे, वालकोळी, तसेच पोलीस शिपाई गणेश जाधवर, सावके, वाघ, बेडवाल, भोसले, चोपडे आणि येसणपुरे सहभागी झाले होते. (Pune News)
Pune News : पुणे विद्यापीठातील मेसची दरवाढ अखेर रद्द; विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला यश





