Pune News : हुंड्यासाठी ५ लाखांची मागणी; उंड्रीत गर्भवती विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा
Pune News : पती, सासू आणि सासऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका २३ वर्षीय गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune News : चारचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्यांकडून मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून उंड्री-वडाचीवाडी परिसरातील २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २४) रात्री घडली. (Pune News)
याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळेपडळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी प्रविण जरांडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह ९ मे २०२६ रोजी ओंकार संजय घिसरे (रा. वडाचीवाडी, उंड्री) याच्याशी झाला होता. (Pune News)
विवाहाच्या वेळी मुलीला दहा तोळे सोने देण्यात आले. तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च माहेरच्यांनी केला. पतीच्या मागणीनुसार नातेवाईकांनी त्याला टीव्हीएस कंपनीची दुचाकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. (Pune News)
लग्नानंतर वैष्णवी सासरी २३ दिवस राहिली. त्यानंतर नोकरीनिमित्त बंगळुरू येथे गेली. जूनअखेरीस ती पुन्हा सासरी आली आणि घरातूनच आयटी कंपनीचे काम करू लागली. त्यावेळी सासू घरकामावरून टोमणे मारत असल्याचे तसेच पती आणि सासरेही अपमानास्पद बोलत असल्याचे तिने माहेरी सांगितले होते. (Pune News)
दरम्यान, १० जून रोजी पती ओंकारने वैष्णवीच्या वडिलांना फोन करून चारचाकी घेण्यासाठी पाच लाख रुपये द्यावेत किंवा गाडी घेऊन द्यावी, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. लग्नासाठी ४० ते ४५ लाख रुपये खर्च झाला असून आता पैसे देण्याची परिस्थिती नसल्याचे वडिलांनी सांगितले. त्यानंतर पतीकडून मुलीला माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी त्रास दिला जात असल्याचे वैष्णवीने आईला सांगितले. (Pune News)
वैष्णवी गर्भवती असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावरूनही पती, सासू आणि सासरे तिला त्रास देत असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. दरम्यान, १९ सप्टेंबरपासून तिला हिंजवडी येथील प्रकल्पावर काम करावे लागत होते. सकाळी ७.४५ वाजता घरातून निघून रात्री आठच्या सुमारास ती घरी परतत होती. त्यानंतरही घरातील कामे करावी लागत असल्याचे ती माहेरी सांगत होती. (Pune News)
२४ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास वैष्णवीने आईला फोन करून सासरी खूप त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास पती ओंकारने तिच्या आईला फोन करून, “तुमच्या मुलीला घरी घेऊन जा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बरेवाईट होईल,” असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. (Pune News)
यानंतर कुटुंबीयांनी वैष्णवीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. २५ सप्टेंबरच्या पहाटे नातेवाईकांकडून वैष्णवीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिचे आई-वडील उंड्री येथील घरी पोहोचले. त्यावेळी वैष्णवीचा मृतदेह गोधडीने झाकलेल्या अवस्थेत आढळला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास काळेपडळ पोलिस करीत आहेत. (Pune News)





