Rishikesh Vaidya : ‘मी देवाचा भक्त’ म्हणत महिलेला जाळ्यात खेचले; भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा जामीन फेटाळला
Rishikesh Vaidya : न्यायालयीन कोठडीत असताना वैद्य याने जामिनासाठी अर्ज केला.

Rishikesh Vaidya : देवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करत लैंगिक अत्याचार केलेल्या भोंदू ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.पी.रागीट यांनी फेटाळला. या प्रकरणातील गांभीर्य, तथ्य व परिस्थिती लक्षात घेता जामीन फेटाळल्याचे आदेशात म्हटले आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना वैद्य याने जामिनासाठी अर्ज केला. या अर्जास सरकारी वकील ॲड. लीना पाठक, फिर्यादीचे वकील ॲड. रोहन नहार यांनी विरोध केला. ॲड. नहार यांना ॲड. ओंकार फडतरे, ॲड. गायत्री पोटवडे आणि ॲड. चैतन्य अभंग यांनी सहकार्य केले. हा गुन्ह गंभीर स्वरूपाचा आहे. (Rishikesh Vaidya)
वैद्य याने धार्मिक गुरू म्हणून असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत पीडितेवर बलात्कार केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला. ही घटना डिसेंबर २०२३ ते ११ मे २०२५ या कालावधीत घडली. Rishikesh Vaidya

Rishikesh Vaidya : ‘मी देवाचा भक्त’ म्हणत महिलेला जाळ्यात खेचले; भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा जामीन फेटाळला
२७ मार्च २०२६ मध्ये हडपसर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी २८ मार्च रोजी त्याला अटक केली. सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. नाशिक येथील कॅप्टन अशोक खरातचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच शहरातील हा प्रकार उघडकीस आला होता.
पीडितेची सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर मी देवाचा भक्त असून, तुला उपासना कशी करायची, हे शिकवितो असे सांगून महिलेला जाळ्यात खेचले. तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Rishikesh Vaidya
हेही वाचा:





