Accident: पुणे-नगर रस्त्यावर अज्ञात वाहनाची महीलेला धडक; मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आवाहन

शिरूर : पुणे-नगर रस्त्यावरील सदरवाडी गावच्या हद्दीतील न्हावराफाटा येथे अज्ञात वाहनाने एका अनोळखी महीलेला (वय. 30 वर्षे, अंदाजे) धडक देवून वाहनासहीत पळून गेला आहे. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हाण शिरूर पोलिसांकडे उभे ठाकले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री १० वा .सुमारास सदरवाडी गावच्या हद्यीत कानिफनाथ मंदिर येथे कोणत्यातरी अज्ञात वाहणाने एका अनोळखी महीला तिच्या अंगावर जांभळे रंगाचा कूर्ता, पॅन्ट व हिरवे रंगाचा स्वेटर या महिलेला धडक देवुन निघुन गेला आहे.
अज्ञात चालकाने वाहन बेदरकपणे भरधाव वेगात चालवून अपघात करून अपघाताची कोणतीही माहिती न देता तो निघून गेला आहे. याबाबत ॲम्बुलन्स चालक सौरभ संतोश महाजन याने शिरुर पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अरुण उबाळे करत आहे.
मयताच्या डाव्या हातावरती इंग्रजीमध्ये कीर्ती असे नाव गोंधलेले आहे. फोटोतील व्यक्ती बाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.





