“उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय…;” संजय राऊतांचे पटोलेंच्या नाराजीनंतर स्पष्टीकरण

Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊत यांनी जागा वाटपावरून राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे म्हटले होते. यानंतर नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचे मिळाले. यावर आज संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“अनेक जागांवरचा तिढा आम्ही सोडवलेला आहे. अर्थात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन असतं. राष्ट्रवादी आणि आमच्या बऱ्याच गोष्टी मोकळ्या झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज मातोश्रीवर येतील. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करतील आणि पुढे मार्ग काढू,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. Sanjay Raut |
नाना पटोले जागा वाटपात अडवणुकीची भूमिका घेत आहेत का? यावर संजय राऊत म्हणाले की, “मी असे म्हटले नाही. मी व्यक्तिगतरित्या कोणावरही मतप्रदर्शन केलेले नाही. तेवढी सभ्यता, सुसंस्कृतपणा आमच्यात आहे. प्रत्येक आघाडीत जागा वाटपाचा कुठेतरी अडथळा निर्माण होतो. भाजप – शिवसेना एकत्र होती तेव्हा देखील असे अडथळे होते.” Sanjay Raut |
कधीही कोणावर व्यक्तिगत टिका टिप्पणी केलेली नाही
“माझी भूमिका ही पक्षाची असते. उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय मी कधीही काहीही बोलत नाही. मी कधीही कोणावर व्यक्तिगत टिका टिप्पणी केलेली नाही. माझी भूमिका ही धोरणात्मक आणि पक्षाची असते. नाना पटोले चर्चेसाठी नको अशा प्रकारच्या भूमिका आम्ही मांडल्याचे मला आठवत नाही. अशा प्रकारच्या भूमिका कोणी घेत नाही,” असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:





