हातात टाळ आणि डोक्यावर तुळस… रिंकू राजगुरु पंढरीच्या वारीत झाली सहभागी

Rinku Rajguru | दरवर्षी मोठ्या भक्तीमय वातावरणात लाखो वारकरी पंढरीच्या वारीत सहभागी होतात. वारीचा हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी तसेच वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक कलाकार वारीत सहभागी होतात.
यंदाही मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार वारीत सहभागी झाले आहेत. यानंतर आता आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु देखील पंढरीच्या वारीत आपल्या वडिलांसह सहभागी झाली. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हातात टाळ आणि डोक्यावर तुळस घेत तिने ही पायवारी केली. यावेळी रिंकूने वडिलांसह फुगडी खेळ खेळली. तसेच रिंकू इतर महिला वारकऱ्यांसह काही पारंपरिक खेळ खेळल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या पारंपरिक लुकने अनेकांचे लक्ष वेधले. Rinku Rajguru |
View this post on Instagram
इनस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “जय जय राम कृष्ण हरी! हा प्रवास माझ्यासाठी खूपच खास आहे कारण, मी ४ वर्षांची असताना माझ्या वडिलांसह पहिल्यांदा वारी अनुभवली होती. आज २० वर्षांनंतर मी पुन्हा तेच क्षण अनुभवतेय…” रिंकूने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
हेही वाचा :





