पुणे : कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीतील सदनिकेत शिरलेल्या एकाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी करुन आरोपी सदनिकेत शिरल्याचे उघडकीस आले असून, पसार झालेल्या आरोपीचा मागा काढण्यात येत आहे.
याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीत तरुणी तिचा भाऊ राहायला आहेत. तिचा भाऊ परगावी गेला होता.
बुधवारी (२ जुलै) सायंकाळी तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्या वेळी आरोपी सदनिकेजवळ आला. त्याने दरवाजा वाजविला. तरुणीने सदनिकेचा दरवाजा (सेफ्टी डोअर) उघडले. तेव्हा त्याने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बातवणी केली. तरुणीने त्याला कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे तिला सांगितले. तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. स्प्रे मारल्यानंतर तिची डोळे जळजळले. त्यानंतर आरोपी तरुण सदनिकेत शिरला.
त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये छायाचित्र काढले आहे. मी परत येईल, असा संदेश मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, कोढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली आहे. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. तरुणीने पोलिसांना आरोपीचे वर्णन दिले आहे. शाेध घेण्यात येत आहेत्याआधारे पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे.