पुणे, -हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा मुक्काम शहरासह जिल्ह्यात कायम असून, शुक्रवारीही हवेली परिसरात नीचांकी ८.४, तर शिवाजीनगर भागात ९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहरात मागील चार दिवसांपासून हवेली, एनडीए, पाषाण, शिवाजीनगर परिसरात किमान तापमान दहा अंशांखाली आला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या. तर स्वेटर, कानटोपी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे राहील, पहाटे हलके धुके पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. परिसर आणि किमान तापमान (अंश से.) हवेली – ८.४, दौंड – ९.१, शिवाजीनगर आणि बारामती – ९.५, एनडीए – १०, तळेगाव – १०.१, इंदापूर – १०.४, आंबेगाव आणि नारायणगाव – १०.५, माळीण – १०.९, पुरंदर – ११.४, हडपसर – १२.१.