Wimbledon Open 2024 : पाओलिनीला मिळाला वॉकओव्हर, पहिल्यादांच उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश..

Wimbledon Open 2024 (Madison Keys vs Jasmine Paolini) : महिलांमध्ये, एकेरीत फ्रेंच ओपन उपविजेती जॅस्मिन पाओलिनीने पहिल्यादांच विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. कारण राउंड आॅफ 16 मध्ये चौथ्या फेरीच्या तिसऱ्या सेटमध्ये 5-5 अशी बरोबरी असताना मेडिसन कीजने पायाच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याने जॅस्मिन पाओलिनी हिला पुढे चाल मिळाली.
इटालियन खेळाडू जस्मिनने पहिला सेट 6-3 असा जिंकला, तर 2017 च्या यूएस ओपनच्या उपविजेत्या कीजने दुसरा सेट 7-6 असा जिंकला होता. जॅस्मिनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मंगळवारी(दि.9 जुलै) अमेरिकेच्या एमा नवारोशी होईल, जिने राउंड आॅफ 16 मध्ये कोको गॉफचा पराभव करत आगेकूच केली होती.
Wimbledon Open 2024 : गतविजेत्या कार्लोस अल्काराझची उपांत्यपूर्व फेरीत धडक…
अशाप्रकारे व्यावसायिक युगात विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी जॅस्मिन पाचवी इटालियन महिला खेळाडू ठरली आणि आता पुढील फेरी जिंकून उपांत्य फेरी गाठणारी पहिली इटालियन खेळाडू बनण्याचा तिचा प्रयत्न असेल.





