Wimbledon Open 2024 : जोकोविचची उपांत्यपूर्व फेरीत धडक, रुनेला केलं पराभूत…

Wimbledon Open 2024 (Quarter-final) : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने होल्गर रुनेचा पराभव करत वर्षातील तिसरे ग्रँडस्लॅम विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-final) प्रवेश केला आहे. जोकोविचने रुआनेचा 6-3, 6-4, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.
उपांत्य फेरी गाठण्यासाठी जोकोविचसमोर उपांत्यफेरीत आता जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या ॲलेक्स डी मिनौरचे आव्हान असेल. हा सामना बुधवारी(10 जुलै) भारतीय वेळनुसार रात्री 7.15 वाजता खेळला जाईल. ॲलेक्स डी मिनौर याने फ्रान्सच्या आर्थर फिल्सचा 6-2, 6-4, 4-6, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
Wimbledon Open 2024 : पाओलिनीला मिळाला वॉकओव्हर, पहिल्यादांच उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश..
या बाबतीत जोकोविचने जिमी कॉनर्सला टाकले मागे…
जोकोविचने कारकिर्दीत 15व्यांदा विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून या ग्रास कोर्ट स्पर्धेत सर्वाधिक वेळा अंतिम आठमध्ये पोहोचणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत जोकोविचने एकूण 14 वेळा विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या जिमी कॉनर्सला मागे टाकले आहे. जोकोविचच्या पुढे फक्त रॉजर फेडरर आहे, ज्याने 18 वेळा वर्षातील तिसऱ्या ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.





