Wimbledon Open 2024 : लोरेन्झो मुसेट्टीची प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Wimbledon Open 2024 (Quarter-final) : इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीने पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत सहा फूट आठ इंच असलेल्या फ्रान्सच्या जिओवन्नी अँपेत्सी पेरीकार्डचा (Lorenzo Musetti vs Giovanni Mpetshi Perricard) पराभव करून प्रथमच विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मुसेट्टीने आपल्या 21 वर्षीय प्रतिस्पर्ध्याचा 4-6, 6-3, 6-3, 6-2 असा पराभव केला.
फ्रान्सच्या जिओवन्नीची सर्व्हिस भेदण्यासाठी मुसेट्टीला थोडा संघर्ष करावा लागला. पण नंतर त्याने पहिल्या सेटची पिछाडी भरून काढून अखेर बाजी मारली. आता उपांत्यपूर्व फेरीत मुसेट्टीसमोर जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचे आव्हान असणार आहे. तर लोरेन्झो मुसेट्टी हा जागतिक क्रमावारीत 25 व्या स्थानी आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना हा बुधवारी(10 जुलै) भारतीय वेळेनुसार 6.45 वाजता होणार आहे.
Wimbledon Open 2024 : जोकोविचची उपांत्यपूर्व फेरीत धडक, रुनेला केलं पराभूत…
दुसरीकडे सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने होल्गर रुनेचा पराभव करत वर्षातील तिसरे ग्रँडस्लॅम विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-final) प्रवेश केला आहे. जोकोविचने रुआनेचा 6-3, 6-4, 6-2 असा पराभव करून विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. तर आॅस्ट्रेलियाच्याॲलेक्स डी मिनौर याने फ्रान्सच्या आर्थर फिल्सचा 6-2, 6-4, 4-6, 6-3 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचसमोर आॅस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनौरचे आव्हान असेल.





