Carlos Alcaraz : गतविजेता अल्काराझ फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये दाखल, मुसेटीच्या दुखापतीने दिला वॉकओव्हर!

Carlos Alcaraz Reaches French Open 2025 Final : फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य फेरीत, विद्यमान विजेता आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या कार्लोस अल्काराझने लॉरेन्झो मुसेटीविरुद्ध शानदार कामगिरी करत ४-६, ७-६, ६-०, २-० अशा फरकाने ३-१ ने विजय मिळवला. हा सामना चार सेटपर्यंत रंगला, परंतु चौथ्या सेटमध्ये मुसेटीला दुखापत झाल्याने त्याने पुढे खेळण्यास नकार दिला, आणि अल्काराझला वॉकओव्हर मिळाले. यामुळे अल्काराझने फ्रेंच ओपन २०२५ च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
आता तो रविवारच्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविच आणि यानिक सिनर यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याची वाट पाहत आहे. हा सामना आज, ६ जून २०२५ रोजी संध्याकाळी होणार आहे.
One step closer to winning his 2nd Roland-Garros title! 👑
📸Getty #alcaraz #carlosalcaraz #rolandgarros #frenchopen #tiebreaktennis pic.twitter.com/ka3eCs7Ocq
— Tiebreak Tennis (@tiebreaktennis_) June 6, 2025
पहिला सेट गमावल्यानंतर अल्काराझचे जबरदस्त कमबॅक –
मुसेट्टी आणि कार्लोस अल्काराझ यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना रोमांचक होता, ज्यामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अल्काराझ पहिल्या सेटमध्ये ४-६ असा पराभूत झाला. त्यानंतर अल्काराझने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले पण त्याला मुसेट्टीकडून सतत कठीण स्पर्धेचा सामना करावा लागला. दुसरा सेट टायब्रेकरमध्ये गेल्यानंतर अल्काराजने तो ६-३ असा जिंकला ज्यामध्ये सेट ७-६ असा संपला. यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अल्काराझचे पूर्ण वर्चस्व दिसून आले, जिथे त्याने मुसेट्टीला एकही गुण मिळवू दिला नाही आणि तो ६-० असा जिंकला.
हेही वाचा – KL Rahul Century : नॉर्थहॅम्प्टनवर केएल राहुलचा शतकी जलवा: कसोटी मालिकेपूर्वी दाखवला ट्रेलर!
चौथ्या सेटमध्ये मुसेट्टी अनफिट घोषित झाल्याने अल्काराजला वॉकओव्हर –
या सामन्याच्या चौथ्या सेटच्या सुरुवातीला कार्लोस अल्काराझने २-० अशी आघाडी घेतली होती, परंतु मुसेट्टीच्या दुखापतीमुळे अल्काराझला वॉकओव्हर देण्यात आला. आता जोकोविच आणि सिन्नर यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात गतविजेता कार्लोस अल्काराझ कोणत्या खेळाडूशी सामना करेल हे ठरवेल.





