‘आलिया भट्टच्या आईची भूमिका करणार का?’ अंकिता लोखंडेला सवाल करताच एल्विश यादव ट्रोल

Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेतील यशानंतर तिने बॉलीवूडमधील सिनेमांमध्ये देखील काम केले. सध्या अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एल्विश यादवच्या पॉडकास्टमधील आहे. ज्यात एल्विश यादव अंकिताला आलिया भट्टच्या आईची भूमिका करणार का? असा सवाल करताना दिसत आहे.
एल्विश यादवनं अंकिता लोखंडेला विचारलं की ‘विकिपीडियावर तुझं वय हे 40 वर्ष दाखवत आहे. तर तू आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारशील का? तर अंकितानं उत्तर दिलं की 40 वर्षांची महिला म्हातारी दिसते का? मी तुला इतकी मोठी दिसते. मी आधी पवित्र रिश्मामध्ये वयानं मोठ्या असलेल्या आईची भूमिका साकारली आहे.’
त्यावर विकी जैन अंकिताचा नवरा म्हणाला, तिनं तिच्या वयाच्या 18 व्या वर्षी आईची भूमिका साकारली होती. मग एल्विशनं पुन्हा विचारलं, तू आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारशील का? अंकितानं उत्तर देत सांगितलं की, नाही मी आलिया भट्टची आई दिसत नाही. मुळीच नाही.’ सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून नेटकऱ्यांकडून एल्विशला ट्रोल केले आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेन्ट करत अंकिताला सपोर्ट केला आहे. Ankita Lokhande |
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
‘एल्विश तू लूजरची भूमिका साकारशील? तू खूप मोठा लूजर आहे.’ ‘लोकं त्याच्या शोमध्ये का जातात?’, ‘हाच प्रश्न एका पुरुषाला विचारता येईल का? , ‘लाज वाटायला हवी, थोडी लाज आहे की नाही?’ अशा कमेन्ट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अंकिता लोखंडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, तिने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेसह त्यानंतर ‘झलक दिखला जा’, ‘कॉमेडी सर्कस’ सारख्या वेगळ्या शोमधून तिचं अभिनय कौशल्य दाखवलं. सध्या अंकिता ही ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये दिसत आहे. Ankita Lokhande |
हेही वाचा:





