Omraje Nimbalkar : “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार”; खासदार ओमराजे निंबाळकर यांची अखेर घोषणा
राजकीय दवाबामुळे, सत्तेमुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, मतदारसंघातील लोकांची कामे होत नाहीत. मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लोकांना भेटलो.

Omraje Nimbalkar – शिंदेसेना पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार, शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गोवर्धन वाडीत कार्यकर्त्यांशी बैठकीत चर्चा केल्यानंतर केली आहे. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर ओमराजे यांनी ही आपली राजकीय भूमिका जाहीर केली.
ओमराजे म्हणाले, राजकीय दवाबामुळे, सत्तेमुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत, मतदारसंघातील लोकांची कामे होत नाहीत. मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लोकांना भेटलो.
चार तास बैठका सुरू होत्या, मी सर्वाचे मत जाणून घेतले. सगळ्याच्या कार्यकर्त्यांच्या मला सूचना आहेत, मला थोडी पार्श्वभूमी सांगायची आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या निवडणूक लढत असताना आम्हाला यश मिळाले नाही. सामान्य नागरिकांना वेळ दिला प्रश्न सोडवले, आम्ही कामात कधी पडलो नाही? सत्तेमुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, असे म्हणत आपली खंत त्यांनी बोलून दाखवली.
ओमराजे पूढे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ठाकरेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांचा स्नेह मला कायम लाभला. मला त्यांच्याबद्दल आदर आहे.
त्यांच्याबद्दल समोरुन काहीही टीका करण्यात आली, काहीही बोलण्यात आले तरी माझ्याकडून कधीच एकही शब्द उलट जाणार नाही, मी त्यांचेही आभार मानतो, असे म्हणत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर खटल्यात राजकीय वैमनस्य होते हे कोर्टाने मान्य केले जाते, पण निकाल आला तो दुर्दैवी. निकालाचे दुःख आम्हाला सहन करावे लागले, एक माणूस आमच्या पाठीशी उभा होता.
कोर्ट निकाल लागला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून बोलणे झाले, तिथेही आम्हाला हायकोर्टात न्याय मिळावा म्हणून आम्ही सागितले.
तसेच, महायुतीमधील पक्षात आलो असलो तरीही, नीच प्रवृत्तीच्या लोकांचा विरोध कायम राहिल, असे म्हणत त्यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी आपला राजकीय विरोध कायम राहिल, असेही ओमराजेंनी स्पष्ट केले.





