Pune District : गडकोट किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न करणार- कांचन कुल
Pune District : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासाठी सहकार्य केले. वासोटा हा किल्ला प्लास्टिक व कचऱ्यापासून मुक्त असलेला किल्ला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे.

खुटबाव : आगामी काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ले संवर्धनासाठी दौंडचे आमदार आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल यांनी केले. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्याला कुल यांनी भेट दिली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी कुल म्हणाल्या की, आमदार कुल यांच्या माध्यमातून विधान भवनामध्ये मागणी केल्यानंतर १६ ऑगस्ट हा शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करण्यात मान्यता मिळाली. तसेच शिरकोली ( ता. राजगड) येथील शिरकाई देवी देवस्थानला क ऐवजी ब दर्जा मिळाला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासाठी सहकार्य केले. वासोटा हा किल्ला प्लास्टिक व कचऱ्यापासून मुक्त असलेला किल्ला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील इतर किल्ले प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त होण्यासाठी आगामी काळामध्ये अभियान राबवणार आहोत.
गड किल्ले संवर्धनासाठी लागणारा निधी मिळवण्यासाठी आमदार कुल यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे. यावेळी दौंड भाजपा शहर अध्यक्ष रितेश ओझा, मायरा कुल, लौकिक गोळे, अमोल मोहिते, प्रकाश शेलार, सोमनाथ जाधव, गणेश दोरगे, सुरज चोरगे, ऋषिकेश धायगुडे,राजू पाचपुते, मयूर शेलार, ओंकार वत्रे, नवनाथ इंगळे, ओंकार बंड, शुभम मारकड, अमोल जाधव, रोहित शेलार, गणेश वाकळे, आदित्य काळे आदी मान्यवर उपस्थित होते.





