कार्तिकच्या जागी ‘दोस्ताना 2’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री?

Dostana 2 Film | करण जोहरचा धर्मा प्रॉडक्शन निर्मिती असलेला ‘दोस्ताना २ चित्रपटाची अपडेट समोर आली आहे. 2021 मध्ये कार्तिक आर्यन आणि धर्मा प्रॉडक्शन्स यांच्यातील मतभेदांनंतर या चित्रपटाचे काम बंद करण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा यावर काम सुरू झाले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा या चित्रपटाविषयी चर्चा सुरु झाली आहे. आता ‘दोस्ताना-2’ च्या कास्टिंगमध्ये बदल करण्यात आल्याचं समजत आहे.
करण जोहर निर्मित ‘दोस्ताना 2’ मध्ये कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवानी यांच्यासोबत जान्हवी कपूरची निवड करण्यात आली होती. त्यात आता लक्ष्य लालवानी हा दोस्ताना-२ या प्रोजेक्टचा भाग असणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आता या चित्रपटासाठी एका अभिनेत्याचं नाव समोर येत आहेत. Dostana 2 Film |
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनने या प्रोजेक्टमधून एक्झिट घेतल्यानंतर आता त्याच्या जागी एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटासाठी विक्रांतच्या मेस्सीच्या नावाला मेकर्सनी पसंती दर्शवली आहे, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर दुसरीकडे मुख्य भूमिकेसाठी विक्रांत मेस्सीच्या कास्टिंगबाबत निर्माते लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. Dostana 2 Film |
समोर आलेल्या माहितीनुसार, दोस्ताना हा सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळे या सिक्वेलसाठी नवीन जोडी निर्मात्यांना हवी होती. विक्रांत सध्या या भूमिकेसाठी एक मजबूत दावेदार समजले जाते. जो रोमँटिक केमिस्ट्री आणि गंभीर भावना दोन्ही पडद्यावर उत्तमरित्या साकारू शकतो. Dostana 2 Film |
हेही वाचा:





