Cabinet expansion : केंद्रात शिंदेसेनेला दोन मंत्रीपदं मिळणार? ‘या’ नावांची चर्चा
Cabinet expansion : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, शिवसेनेच्या दोन खासदारांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे.

Cabinet expansion : नुकत्याच १० राज्यातील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे. या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केंद्रात 2 मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंकडून पक्षाची ताकद आणि खासदारांचा आकडा वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या खासदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती सूत्रांची आहे. Cabinet expansion
जास्तीत जास्त खासदारांना सोबत घेऊन केंद्रात वजन वाढवण्याचा शिंदेसेनेचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने अॅापरेशन टायगर राबविण्याची तयारी पक्षाकडून सुरू असून हालचालींना वेग आला आहे. Cabinet expansion
केंद्र सरकारमध्ये दोन मंत्रीपदं मिळणार असल्याची शक्यता असून त्यामुळे शिवसेना नेत्यांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केले आहे. असे असले तरी प्रामुख्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

Cabinet expansion
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास काही मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो, तर काही खासदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ठाकरे गटाचे किती खासदार संपर्कात आहेत आणि पुढील राजकीय रणनीती काय असेल, यावर चर्चा झाल्याचे समजते. यावेळी शिंदेंसोबत खासदार डॅा. श्रीकांत शिंदेंसह काही खासदार देखील उपस्थित होते. त्यामुळे केंद्रात मंत्रीपद मिळण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.





