Harshvardhan Sapkal : “निवडणुका आणि सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे”; बारामती आणि राहुरीमध्ये लढण्याची काँग्रेसची भूमिका?
Harshvardhan Sapkal : निवडणुका आणि सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे आहेत. अजित पवार यांचे अकाली व अपघाती निधन ही दुख:द घटना आहे - हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर बारामतीत, तर शिवाजी कर्डिले यांच्या मृत्यूमुळे राहुरीत पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत काँग्रेसकडून देण्यात आले आहेत. Harshvardhan Sapkal
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले? Harshvardhan Sapkal
याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “राज्यात याआधी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले होते. नांदेड, पुण्यातील कसबा, देगलूर मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. Harshvardhan Sapkal
नांदेड लोकसभा व देगलूरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेस विरोधात उमेदवार दिले होते. त्याठिकाणी काँग्रेस विजयी झाली तर कसबा पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते.” Harshvardhan Sapkal
“निवडणुका आणि सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे आहेत. अजित पवार यांचे अकाली व अपघाती निधन ही दुख:द घटना आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते.Harshvardhan Sapkal
महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकांसदर्भात त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ’,” अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी घेतली.
….तर पवार विरुद्ध पवार निवडणूक झालीच असती
“बारामतीचा विचार करता या मतदारसंघात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पवार विरुध्द पवार निवडणुका झाल्या आहेत व राज्यसभेलाही आठवा उमेदवार असता तर पवार विरुद्ध पवार निवडणूक झालीच असती,” असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. Harshvardhan Sapkal
‘बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक एकाचवेळी होणार आहे. दोन्ही जागा नेत्यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या आहेत. सामंजस्याने दोन्ही ठिकाणची उमेदवारी बिनविरोध करावी,’ असे आवाहन याआधीच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले होते. Harshvardhan Sapkal
दरम्यान, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित आहे. राहुरीत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे.
हेही वाचा:






