Rahuri by-election : शरद पवार गटाचा बडा नेता मोठा निर्णय घेणार? मुख्यमंत्र्यांच्या सभेत मोठी घडामोड घडण्याची शक्यता
Rahuri by-election : राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rahuri by-election : महाराष्ट्रात सध्या बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका होत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामतीत अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असून प्रमुख विरोधक नसल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. Rahuri by-election
मात्र, राहुरी मतदारसंघात चित्र वेगळे आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही निवडणूक लागली असून भाजपने त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रचारसभेकडे स्थानिकांचे लक्ष लागले असून, शरद पवार गटातील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेची आहे. सुरुवातीला शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढवतील, अशी शक्यता होती. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने शऱद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने देखील इथे उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस असणार आहे. (Rahuri by-election)
दरम्यान, तनपुरे भाजपला पाठिंबा देणार का किंवा थेट पक्षप्रवेश करणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ते आज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांच्या निर्णयामुळे राहुरीतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तनपुरेंच्या भूमिकेकडे लक्ष (Rahuri by-election)

Rahuri by-election : शरद पवार गटाचा बडा नेता मोठा निर्णय घेणार? मुख्यमंत्र्यांच्या सभेत मोठी घडामोड घडण्याची शक्यता
राहुरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या आणि साखर कारखान्यांवर तनपुरे कुटुंबाचे वर्चस्व असल्याने त्यांचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यास तो शरद पवार गटासाठी मोठा धक्का असणार आहे. प्राजक्त तनपुरे यांनी 20 तारखेला म्हणजेच आजच कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे प्राजक्त तनपुरे आज काय भूमिका घेतात याकडे लक्ष असणार आहे.
हेही वाचा : Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयानंतर सोन्याची चमक फिकी; जाणून घ्या आजचे नवे दर





