Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयानंतर सोन्याची चमक फिकी; जाणून घ्या आजचे नवे दर
Gold Silver Price Today : 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 810 रुपयांनी वाढ झाली होती

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले असूनही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतीया अनेकांनी थोडेफार का होईना सोनं-चांदी खरेदी केली. मात्र आता अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्याच दिवशी, सोमवारी सराफा बाजारात घसरण झाली आहे.
एक दिवसाच्या स्थिरतेनंतर राजधानी दिल्लीमध्ये 24 व 22 कॅरेटचं सोनं प्रति 10 ग्रॅमसाठी 490 रुपयांनी स्वस्त झालं. 19 एप्रिल रोजी, 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 810 रुपयांनी, तर 22कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांनी वाढ झाली होती. तर काल भाव स्थिर होते. गोल्ड रिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेटचं सोनं प्रति १० ग्रॅम १,५५ ,२९० रुपये आहे. Gold Silver Price Today
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली. आठवड्याच्या सुरुवातीला १० ग्रॅम सोनं १,५२,६४२ रुपयांना होतं, तर तेच आठवड्याच्या शेवटी १,५४,६०५ रुपये १० ग्रॅम वर पोहोचला आहे. म्हणजेच, एका आठवड्यात सोन्याचे दर १,९५३ रुपयांनी वाढले.
चांदीच्या दरातही घसरण (Gold Silver Price Today)
याशिवाय चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदी प्रति किलोग्रॅम दरात 100 रुपयांची घट झाली आहे. अक्षय तृतीयेला चांदीचा भाव स्थिर राहिला आणि आज दिल्लीत ती 100 रुपयांनी स्वस्त होऊन 2 लाख 75 हजार 900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. Gold Silver Price Today
हेही वाचा:






