मोठी बातमी..! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? काय आहे कारण?

मुंबई : लाडकी बहीण योजनेत महिलांना ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला आहे. ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, महिलांना नोव्हेंबरचा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. यामुळे राज्यातील २८८ निमशहरांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात कोणताही निधी दिला जात नाही.
त्याआधीच ऑक्टोबरचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळेच कदाचित महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही. दरम्यान, याबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आधीच एकत्र देण्यात आला होता. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळेच या वेळेसदेखील लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागू शकतो, असे सांगितले जात आहे.




