निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरच्या अगोदर लागणार? बड्या नेत्याचं मोठं विधान; चर्चांना उधाण, नेमकं काय म्हणाले?

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकाल लांबवणीवर टाकल्याने नाराजी व्यक्त केली. नगरपरिषद आणि नगरपंचातींचा मतमोजणी करून निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. पण अशातच आता महायुतीमधील एका मंत्र्यांने एक मोठं विधान केले आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अजित पवार गटाचे बडे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीचा निकाल २१ डिसेंबरपूर्वी लागू शकतो, असे मोठं विधान केले आहे. मतदान केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुश्रीफांनी वरील विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले हसन मुश्रीफ?
महत्वाची माहिती समोर
या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरचा का जाहीर करण्यात येणार आहे, याबाबत आता माहिती समोर आली आहे. फ्री अँण्ड फेअर इलेक्शन बाधित होईल, असा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती आहे. तर २० तारखेच्या दिवशी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल दाखविण्यात यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता २० तारखेपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता चालू राहणार आहे.
हेही वाचा : Samantha Ruth Prabhu: लग्नानंतर समंथाची बहिणींना उद्देशून भावूक पोस्ट





