Samantha Ruth Prabhu: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि हिंदी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय असलेल्या सामंथा रुथ प्रभु अलीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’चे सह-निर्देशक राज निदिमोरु यांच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. बहिणींना समर्पित भावूक संदेश लग्नानंतर समंथाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन बहिणींचा एक सुंदर फोटो शेअर केला. त्यासोबत तिने एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला. “माझ्या प्रिय बहिणींनी मला नेहमी खूप काही शिकवले आहे. आजही त्या मला अधिक चांगला माणूस बनण्याचा मार्ग दाखवत असतात. माझ्या प्रिय बहिणींनो, मी तुम्हाला खूप प्रेम करते आणि कायम करत राहीन.” समंथाचा हा भावनिक संदेश चाहत्यांच्या मनाला भिडला. समंथाचा अभिनय प्रवास समंथा आणि तिच्या बहिणी यांच्यातील नाते अत्यंत घट्ट आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांत बहिणी नेहमीच समंथाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. नव्या आयुष्याची सुरुवात करत असताना बहिणींसाठी लिहिलेला हा प्रेमळ संदेश तिच्या कुटुंबाशी असलेल्या दृढ नात्याची साक्ष देतो. सामंथाने करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. 2010 सालच्या तमिळ चित्रपट ‘विन्नैथांडी वरुवाया’ मधून तिच्या अभिनयाची सुरुवात झाली. त्यानंतर तिने एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले. लोकप्रिय चित्रपट डुकुडू थेरी जनता गैराज अ आ अनजान सन ऑफ सत्यमूर्ती हिंदी प्रेक्षकांमध्ये तिची लोकप्रियता ‘फॅमिली मॅन 2’ मधील राजीच्या दमदार भूमिकेमुळे आणखी वाढली. त्यानंतर ती वरुण धवनसोबत ‘सिटाडेल: हनी बनी’ मध्येही दिसली. समंथा आणि राज निदिमोरुचा विवाह ‘फॅमिली मॅन 2’ च्या शूटिंगदरम्यान समंथा आणि राज यांच्यात जवळीक वाढली आणि त्यातूनच त्यांच्या नात्याला नवी दिशा मिळाली. विशेष म्हणजे, हा दोघांचाही दुसरा विवाह आहे. समंथा 2021 मध्ये नागा चैतन्य यांच्यापासून विभक्त झाली. तर राज यांनी 2022 मध्ये पहिली पत्नी श्यामाली डे यांच्याशी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ताज्या पोस्टमधून स्पष्ट दिसते की, नव्या अध्यायाची सुरुवात करत असतानाही समंथा कुटुंबाला सर्वप्रथम मान देते.