Eknath Shinde: आज अशी एक बातमी समोर आली, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अलीकडेच दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. त्याचवेळी ठाकरे गटाच्या काही खासदारांशी संपर्क साधल्याच्या दाव्यांमुळे ‘ऑपरेशन टायगर’ (operation tiger) पुन्हा चर्चेत आले. मुंबईत परतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे आठ खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या. मात्र, काही दिवसांनंतर या चर्चांचा जोर कमी झाला होता. दरम्यान, शिंदे साताऱ्यातील दरे गावाला गेल्यानंतर पुन्हा एकदा या चर्चांना हवा मिळाली अन् ठाकरेंच्या आठ खासदारांची शिंदेंसोबत गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आले. Eknath Shinde Eknath Shinde : खरंच ठाकरेंचे खासदार फुटणार? “गेल्या एक-दीड वर्षांपासून…”; एकनाथ शिंदेंनी मौन सोडलं या आठ खासदारांमध्ये अरविंद सावंत यांचेही नाव होते. त्यांनी या बातमीला खोटी असल्याचे सांगत संतप्त प्रतिक्रिया दिली. या पार्श्वभूमीवर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी या सर्व चर्चांवर पडदा टाकत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांसोबत गुप्त बैठक झाल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणाऱ्या आहेत. अशी कोणतीही बैठक झालेली नाही,” असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले, “गेल्या एक-दीड वर्षांपासून खासदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत, त्या माध्यमांनी टाळाव्यात.” असा सल्ला त्यांनी दिला. याआधी खासदार श्रीकांत शिंदे यांनीही हे वृत्त फेटाळून लावले होते. तर दुसरीकडे, शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी “लवकरच स्पष्ट चित्र समोर येईल,” असे सूचक विधान केले होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठाकरे आपल्या खासदारांना वेळ देत नसल्याने ते शिंदे यांच्या संपर्कात आले असावेत, असा दावा केला होता. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व चर्चांना फेटाळून लावत ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे खासदार फुटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांनीही ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे. नेमका दावा काय आहे? Eknath Shinde उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अनिल देसाई वगळता आठ खासदार संपर्कात असून, बुधवारी रात्री ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत या खासदारांची बैठक झाल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीला 8 पैकी 6 खासदार प्रत्यक्ष तर दोन खासदार व्हिडिओ कॉलवरून उपस्थित होते, असा दावा करण्यात आला आहे. या वृत्ताला खोटे असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले असली तरी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या प्रचार करायला जाणार का? सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाल्या..