Maharashtra Politics : मोठी बातमी..! ठाकरेंच्या माजी खासदाराला अटक होणार? कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला
Maharashtra Politics : शिवसेना (ठाकरे गट)चे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Maharashtra Politics : शिवसेना (ठाकरे गट)चे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सुनेच्या छळप्रकरणी दाखल गुन्ह्यात ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला असून, अटकेपासून कोणतेही तात्पुरते संरक्षण देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोघांनाही कोणत्याही क्षणी पोलिसांकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)
कोर्टाने काय म्हटलं?
अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, अर्जदारांच्या वकिलांचा युक्तिवाद आणि अर्जाचा अभ्यास करण्यात आला. मात्र, एफआयआरमधील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने अर्जदारांना अटकेपासून तात्पुरता दिलासा देण्यासाठी कोणतेही ठोस कारण दिसून येत नाही. त्यामुळे अंतरिम संरक्षणाची मागणी फेटाळण्यात आली. (Maharashtra Politics)
यासोबतच मुख्य अटकपूर्व जामीन अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी प्रतिवादीला नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
अटकेची शक्यता कायम
न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारल्यामुळे आणि पुढील सुनावणीपर्यंत अटक करू नये, असे कोणतेही निर्देश पोलिसांना दिले नसल्याने, तपासाच्या गरजेनुसार पोलिसांकडून विनायक राऊत आणि गितेश राऊत यांना चौकशीसाठी कधीही ताब्यात घेतले जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्यावरील अटकेची शक्यता कायम असल्याचे मानले जात आहे. (Maharashtra Politics)
सुनेच्या तक्रारीनंतर गुन्हा
विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत कुटुंबीयांवर मानसिक छळासह विविध गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या आधारे विनायक राऊत, त्यांची पत्नी, पुत्र गितेश राऊत आणि इतरांसह एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
Vinayak Raut : विनायक राऊत यांना मोठा धक्का; सुनेच्या आरोपांनंतर पोलीस…
Vinayak Raut : राऊत कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ! मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक






