NCP Women State President Post : सुनेत्रा पवार भाकरी फिरवणार? महिला प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता
NCP Women State President Post : पक्षातील संघटनात्मक बदलांवर या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

NCP Women State President Post : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी मध्यरात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत रिक्त पदे भरणे, काही पदांवर फेरनियुक्त्या करणे आणि आगामी राजकीय रणनीती यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. पक्षातील संघटनात्मक बदलांवर या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (NCP Women State President Post)
मिळालेल्या माहितीनुसार, महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक प्रदेशाध्यक्ष या महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तर विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष या पदांवर सध्या कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NCP Women State President Post : सुनेत्रा पवार भाकरी फिरवणार? महिला प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता
या चेहऱ्यांना संधी मिळणार? (NCP Women State President Post)
सूत्रांच्या माहितीनुसार, महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे आणि विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे यांच्या नियुक्तीवर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होऊ शकते. या बदलांमुळे पक्ष संघटनेला नवे बळ मिळेल, असा विश्वास पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी राजीनामा दिला होता. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर त्यांच्यावर राजकीय दबाव वाढला होता. त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षातील महिला प्रदेशाध्यक्ष जबाबदाऱ्यांमधूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.
आता त्यांच्या जागी नवीन नेतृत्वाची निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगितले जात असून, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.





