लॉकडाऊनच्या काळात विल स्मिथ झाला बेढब

जगभर अनेक देशात लॉकडाऊन लागू असल्यामुळे व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे तंदुरुस्त असणाऱ्यांच्या फिजीकची अवस्था वाईट झाली आहे. हॉलीवूडमधील सुपरस्टार विल स्मिथच्या बाबतीतही तसेच झाले आहे.
विल स्मिथने अंडवेअर आणि जॅकेटमधील एक फोटो पोस्ट करून सध्या आपले फिजीक व्यवस्थित नसल्याचे सांगितले आहे. हॉलीवूडमधील अभिनेत्याला साजेशी शरीरयष्टी नसल्याबद्दल विल स्मिथ दुःखी झाला आहे. त्याच्या या पोस्टवर “टर्मिनेटर’ अर्नोल्ड श्वार्नझेनेगरनीही कॉमेंट केली आहे. “बच्चा तुझ्या दुःखात मला रडावेसे वाटते आहे.’ असे अर्नोल्डने म्हटले आहे.
अशाप्रकारे लॉकडाऊनमध्ये बेढब होणाऱ्यांची संख्या कमी नाही, हे कॉमेंटवरून लक्षात येते. विल स्मिथने हॉलिवूडमधील मेन इन ब्लॅक, स्टुडंट ऑफ द इयर 2, बॅड बॉईज सिरीज, हॅंकॉक, आफ्टर अर्थ आणि फोकस सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. विल स्मिथ स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी खूप लक्ष देत असतो. त्याने 44 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण धावण्याचा प्रयत्नही केला आहे.





