अरबाज नंतर सलमान खान देखील अडकणार विवाहबंधनात.. असं करणार लग्न ? अभिनेत्याने चालू शोमध्ये सांगूनच टाकलं

Salman Khan : नुकतंच सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने दुसरं लग्न केलं. त्यानंतर सलमान कधी लग्न करणार असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जाऊ लागला होता.त्याबाबत आता स्वतः सलमान खानने आपलं म्हणणं मांडल आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या वीकेंड का वार भागात बॉलिवूड ब्युटी तब्बू सहभागी झाली होती. यावेळी तिने स्पर्धकांसह चांगल्याच गप्पा मारल्या. तब्बूने अंकिता-विकीसह सर्वांसोबत खूप मस्ती केली.यावेळी लग्नाला विषय निघाल्याने तब्बूने त्यावर देखील भाष्य केलं. तब्बूसोबत सलमान खाननेही लग्नाबाबत खुलासा केला आहे.
यावेळी ‘वीकेंड का वार’मध्ये स्पर्धकांनी एकमेकांसोबत खूप मजा केली. जेव्हा तब्बू शोमध्ये आली तेव्हा सलमानने सांगितले की त्यांच्यात चांगले नाते आहे. दोघांनीही एकमेकांच्या प्रश्नांना आलटून पालटून उत्तरे दिली. कुटुंबातील सदस्यांनी या बाँडिंगचा खूप आनंद घेतला. यानंतर तब्बूने त्या स्पर्धकांचे कौतुक केले जे तिचे आवडते आहेत.
तब्बू अंकिताला गोड म्हणते आणि विकीला तिच्या नवीन वर्षाच्या नृत्यासाठी अभिनंदन करते. तिने विकीला विचारले लग्नात किती फेरे घेतले होते. त्यावर विकीने उत्तर दिले चार पेक्षा जास्त फेरे घेतले होते.पुढे त्याने हे देखील सांगितले जेव्हा शोमध्ये आलो होतो तेव्हा सलमान भाईंनी पुन्हा फेरे घ्यायला लावले त्यांना वाटलं मी नाही घेतले तर याला घेऊद्या असं देखील विकी यावेळी मस्करीत बोलला.
विकीच्या मुद्द्यावर तब्बू म्हणाली, “जर आपण ते करत नसलो तर ते इतरांनी करावं असं वाटत” आता तुम्ही लोक निघून गेलात, आम्ही बाकी आहोत.” हे ऐकून सलमान उपरोधिकपणे म्हणाला, ”आम्ही व्हीलचेअरवर लग्न करू.. आणि तिथून थेट आगीत जाऊ. ( मरून जाऊ )





