Salman Khan: “६० वर्षांचा झालो, पण लढणं विसरलो नाही”; रुग्णालयाबाहेरील प्रकारामुळे सलमान खान संतापला
Salman Khan सगळ्यात जास्त चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे सलमानची वयाबाबतची पोस्ट. त्याने लिहिलं, “मी ६० वर्षांचा झालो आहे, पण लढणं अजून विसरलो नाही.” या वाक्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाबाहेर घडलेल्या एका प्रकारामुळे सलमान खान प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळालं. रुग्णालयात असताना काही पापाराझींनी त्याचा पाठलाग करत फोटो आणि व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे सलमानने आधी रुग्णालयाबाहेरच त्यांना सुनावलं आणि नंतर मध्यरात्री सोशल मीडियावर सलग पोस्ट करत आपला राग व्यक्त केला.
View this post on Instagram
माहितीनुसार, सलमान खान एका कामासाठी हिंदुजा रुग्णालयात गेला होता. त्याची गाडी ट्रॅफिक सिग्नलवर दिसल्यानंतर काही फोटोग्राफर्स त्याच्या मागे रुग्णालयापर्यंत पोहोचले. रुग्णालयाबाहेर येताच त्यांनी “भाई… भाई…” अशा आरोळ्या देत त्याचे फोटो काढण्यास सुरुवात केली. हे पाहून सलमान चिडला आणि त्याने त्यांना शांत राहण्यास सांगितले.
यानंतर सलमानने रात्री उशिरा सोशल मीडियावर काही सेल्फी पोस्ट करत आपली नाराजी स्पष्ट शब्दांत मांडली. त्याने लिहिलं की, “मी नेहमी माध्यमांसोबत उभा राहिलो, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या कामाचा आदर केला. पण जर कुणी माझ्या दुःखातून पैसा कमवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चुकीचं आहे.”
View this post on Instagram
सलमानने पुढे लिहिलं की, “चित्रपटापेक्षा आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे.” आपल्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटाचा उल्लेख करत त्याने सांगितलं की, प्रसिद्धी आणि कमाईपेक्षा माणसाचं वैयक्तिक आयुष्य आणि वेदना अधिक महत्त्वाच्या आहेत.
त्याच्या आणखी एका पोस्टमध्ये सलमानने इशाराच दिल्यासारखं लिहिलं, “तुमच्या घरातील एखादी व्यक्ती रुग्णालयात असेल तर तुम्हाला असं वागणं आवडेल का?” त्याने माध्यमांनी संवेदनशीलतेने वागण्याची अपेक्षा व्यक्त केली.
View this post on Instagram
सगळ्यात जास्त चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे सलमानची वयाबाबतची पोस्ट. त्याने लिहिलं, “मी ६० वर्षांचा झालो आहे, पण लढणं अजून विसरलो नाही.” या वाक्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काहींनी सलमानच्या संतापाला योग्य म्हटलं, तर काहींनी सेलिब्रिटींनी सार्वजनिक आयुष्याचा भाग म्हणून संयम ठेवायला हवा, असं मत व्यक्त केलं.
दरम्यान, रुग्णालयाबाहेरील सलमानचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची मर्यादा आणि पापाराझी संस्कृती यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे





