Rohit Sharma : ‘ए सोड त्याला…’, लहान चाहत्यासाठी रोहितनं सुरक्षारक्षकाला सुनावलं! पाहा हिटमॅनचा राग अन् प्रेम

Rohit Sharma Angry on Security Gaurd for little Fan : भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत तो शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. या मालिकेची तयारी करण्यासाठी रोहितने जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्कवर सराव करताना रोहितने एका लहान मुलाप्रती दाखवलेल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिवाजी पार्कवर सरावादरम्यान चाहत्यांची गर्दी
रोहित सध्या त्याचा मित्र आणि मुंबई इंडियन्सचा माजी सहकारी अभिषेक नायरसोबत सराव करत आहे. शिवाजी पार्कवर नेट्समध्ये सराव करताना त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेक चाहते रोहितची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्याकडून स्वाक्षरी घेण्यासाठी उत्सुक होते. यावेळी रोहितने आपल्या कृतीने सर्वांचे मनं जिंकले.
लहान चाहत्यासाठी रोहित सुरक्षारक्षकावर संतापला –
A security guard stopped a kid a bit too harshly, Rohit immediately intervened and asked him to let the kid come. 🥹🤌🏻
Truly Ro is one of the kindest souls. ❤️
— Rohan💫 (@rohann__45) October 10, 2025
सरावादरम्यान एका लहान मुलाला रोहितला भेटण्याची इच्छा होती, पण सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले. हे पाहून रोहित संतापला आणि त्याने सुरक्षारक्षकांना जोरात सुनावले. त्याने त्या मुलाला जवळ बोलावून त्याच्याशी संवाद साधला. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सच्या चाहत्याला रोहितची खास भेट –
A little kid was crying in front of Rohit Sharma while taking his autograph, so Rohit gently patted his back to comfort him.😭❤️🫂
This shows the pure love fans have for @ImRo45 🐐 pic.twitter.com/aTT04xNANi
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 10, 2025
दुसऱ्या एका व्हायरल व्हिडीओत रोहित मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेल्या एका लहान चाहत्याला स्वाक्षरी देताना दिसत आहे. जर्सीवर स्वाक्षरी मिळाल्याने तो मुलगा इतका भावूक झाला की, त्याला अश्रू आवरता आले नाहीत. रोहितला भेटून तो रडतच तिथून बाहेर पडला. या घटनेने रोहितच्या चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित खेळाडू म्हणून खेळणार –
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा केवळ खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. अलीकडेच भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद रोहितकडून काढून शुबमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे गिल आता वनडे संघाचा नवा कर्णधार असेल आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून तो कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.
हेही वाचा – IND vs WI : जैस्वालच्या रनआऊटवरून वाद! गिलवर ठपका की खेळाचा भाग? काय म्हणाला? पाहा VIDEO
या मालिकेत रोहितसह विराट कोहलीही वनडे संघात खेळताना दिसेल.ही वनडे मालिका 19 ते 25 ऑक्टोबरदरम्यान होईल, तर त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल.





