ज्ञानवापीमधील पुरावे सुरक्षित ठेवणार; देखरेख ठेवण्यासाठी विशेष टीम नेमणार

वाराणसी – वाराणसीतील प्रसिद्ध ज्ञानवापी (gyanvapi) -मां शृंगार गौरी प्रकरणातील वादी राखी सिंगच्या अर्जावर जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाचा गुरुवारी आदेश आला आहे.
त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) केलेल्या सर्वेक्षणात सापडलेले पुरावे ज्ञानवापी (gyanvapi) संकुलात सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी टीम तयार करून त्यावर देखरेख ठेवण्याबाबतही न्यायालयाने आदेश दिले आहेत.
या सर्वेक्षणात आतापर्यंत सापडलेल्या पुराव्यांची यादी तयार करून जिल्हा दंडाधिकारी आणि न्यायालयाला सादर करण्यासही न्यायालयाने एएसआयला सांगितले आहे.
तपासात पारदर्शकता यावी आणि आवश्यकता भासल्यास ते न्यायालयात सादर करता यावेत यासाठी एएसआयच्या सर्वेक्षणात सापडलेले सर्व पुरावे आणि अवशेष पूर्णपणे सुरक्षित ठेवावेत, असे जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशात म्हटले आहे.





