पवन कल्याणच्या हातून मोठा प्रोजेक्ट जाणार? सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय…

Pawan Kalyan | एसआरटी एंटरटेन्मेटंचे निर्माते राम तल्लुरी यांनी चार वर्षांपूर्वी पवन कल्याणसोबत एका सिनेमाची घोषणा केली होती. अजूनही या सिनेमावर काम सुरू झाले नसून याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ‘एजंट’ सिनेमाचे दिग्दर्शक सुरेंदर रेड्डी हे करणार होते. प्रॅाडक्शन टीमला पवन कल्याण यांच्यासोबतच सिनेमा बनवण्याचा विचार करत आहे, मात्र, सध्या पवन कल्याण हे आंध्र प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. यामुळे आता त्यांच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन चार वर्षांपूर्वीपासून रखडेल्या सिनेमा पूर्ण केला जाणर असल्याचे समजते.
चार वर्षांनंतर आता निर्मात्यांनी पवन कल्याण यांच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन या सिनेमाची कथा पूर्ण केली जाणार आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार सिनेमातील लीड कलाकारही बदलण्यात आले आहेत. तसेच पवन कल्याण-सुरेंद्र रेड्डी या दिग्दर्शक अभिनेत्याच्या जोडीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे. आता या माध्यमांत आलेल्या माहितीत निर्मात्यांकडून स्पष्टीकरण येणे बाकी आहे, यामुळे आता सिनेमाचे निर्माते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
पवन कल्याण यांच्ये काही सिनेमांची शूट अगोदरच पूर्ण झाले असून आता हे सिनेमे रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. पवन कल्याण यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘हरी हरा वीरा मल्लू: भाग 1 – तलवार vs स्पिरिट’ यावर्षी थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहेत. दाखल होण्यासाठी सज्ज आहे. या सिनेमाची कथा मुघल काळाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून सिनेमा ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा असणार आहे. ९ मे रोजी जगभरातील थिएटर्समध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. निधी अग्रवाल सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स बॉबी देओल आणि नोरा फतेहीही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.




