विशाल आणि अभिनेत्री साई धनशिकाचा पार पडला साखरपुडा

Vishal engaged with actress sai dhanshika | तमिळ अभिनेता विशाल आणि अभिनेत्री साई धनशिका यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. यावर्षी मे महिन्यात दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. आता विशालने वाढदिवसानिमित्त ही बातमी चाहत्यांना सांगितली, ज्यामुळे चाहते खूप आनंदी आहेत. सध्या त्यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अभिनेता विशाल म्हणाला, “या विश्वाच्या कानाकोपऱ्यातून माझ्या खास वाढदिवसाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व प्रियजनांचे आभार. आज साई धनशिकासोबत झालेल्या माझ्या साखरपुड्याची आनंदवार्ता माझ्या कुटुंबासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. मी खूप आनंदी आहे. नेहमीप्रमाणे तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यावर राहोत, हीच इच्छा आहे.” सध्या त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दोघांमध्ये 12 वर्षांचे वयाचे अंतर
विशाल 48 वर्षांचा आहे, तर धनशिकाचे वय सध्या 35 आहे. दोघांमध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अंतर आहे. वयातील अंतरामुळे देखील दोघे चांगलेच चर्चेत आले आहेत. Vishal engaged with actress sai dhanshika |
विशाल साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. 2004 मधील तमिळ चित्रपट ‘चेलामई’मुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. तर साई धनशिका 2016 मध्ये आलेल्या कबाली चित्रपटात तिने रजनीकांतच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. Vishal engaged with actress sai dhanshika |
हेही वाचा:
“खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स बंद…,आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला का?”; रोहित पवारांचा सवाल




