ड्रॅगनसाठी प्रचंड मेहनत! अभिनेता ज्युनिअर एनटीआरचा जीममधला व्हिडीओ समोर

Junior NTR : दक्षिण चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या आगामी “ड्रॅगन” सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचा नुकताच सोशल मीडियावर एक जिम व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडीओत तो जीममध्ये प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे.
ड्रॅगन हा सिनेमा प्रशांत नील दिग्दर्शित करणार आहेत. त्यांनी याअगोदर केजीएफ आणि सलार या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ड्रॅगन या सिनेमासीठी एनटीआर खूप मेहनत घेत असल्याचं या व्हिडिओवरून दिसत आहे. व्हिडीओत त्याची बॅाडी आधीपेक्षा आता तंदुरुस्त दिसत आहे. त्याचे घटलेले वजन आता वाढले असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
Every drop of sweat is building up for the destruction 💥💥
Man of Masses @tarak9999 pushing limits for the hysteria of #NTRNeel 🔥🔥#NTR pic.twitter.com/1Tr55smIj2
— Vamsi Kaka (@vamsikaka) September 16, 2025
अभिनेत्याने यापूर्वी ‘आरआरआर’ सारख्या सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता तो ‘ड्रॅगन’साठीही दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहे. हा सिनेमा प्रशांत नील यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी सिनेमा असल्याचं सांगण्यात आलं आहे. दिग्दर्शकाला कोणत्याही बजेटचे बंधन नसल्याचे वृत्त समोर आलं आहे.
या सिनेमात कॅमेऱ्यामागील तीच मजबूत टीम आहे, ज्यांनी KGF सारख्या सिनेमॅटिक एक्सप्रेरिएन्स प्रेक्षकांना दिला. आता पुन्हा हीच टीम ड्रॅगमसाठी काम करणार आहे. यामुळे सिनेमाची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, प्रशांत नील कोणता चमत्कार या सिनेमात करणार यासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.




