दंगेखोरांना सोडणार नाही – गृहमंत्री

दिल्लीः राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचारात ठार झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहा म्हणाले की दंगेखोर कोणत्याही जाती, धर्म किंवा पक्षाचा असला तरी त्याला माफ केले जाणार नाही.
अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितले की, दिल्ली हिंसाचाराच्या संदर्भात 700 हून अधिक एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.
दंगलीत सामील झालेल्या 1922 लोकांची आतापर्यंत ओळख पटली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले मी आश्वासन देतो की, दंगलीसाठी जबाबदार असलेले लोक आणि दंगलीचे षडयंत्र करणार्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.
परदेशातून आलेल्या पैशासंदर्भात बोलताना ते म्हणाले, पोलिसांनी या संदर्भात पाच जणांना अटक केली असून, त्यांचा तपशील सरकाकांकडे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच त्यांना पकडण्यासाठी 40 हून अधिक विशेष पथकांची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिल्लीतील बर्याच घटनांमध्ये काही वैयक्तिक शस्त्रास्त्रांचा देखील वापर करण्यात आला आहे. अशी 49 प्रकरणे नोंदविण्यात आली असून 52 जणांना अटक करण्यात आली आहे.
दंगलीत वापरल्या गेलेल्या शस्त्रास्त्रांपैकी जवळपास शंभरशे शस्त्रे जप्त केली आहेत. 25 फेब्रुवारी पासून दिल्लीच्या प्रत्येक पोलिस ठाण्यात शांतता समित्यांची बैठक सुरू आहे .
26 फेब्रुवारीपर्यंत 321 अमन समित्यांची बैठक बोलावून आम्ही सर्व पंथातील धार्मिक नेत्यांना दंगल रोखण्यासाठी विनंती केली आहे.
दिल्ली हिंसाचाराच हे सुनियोजित षडयंत्र असल्याचे म्हंटले आहे. प्रकरणातील कोणत्याही गुन्हेगाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
दंगलीत ठार झालेल्यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, “ज्याने कोणी दंगा केला असेल, त्यांना मला सभागृहातून सांगायचा आहे, दंगेखोर कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही. ”
शहा म्हणाले की, दंगलीत कोणाच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, यासंदर्भात दावे सेटलमेंट कमिशन स्थापन करण्यासाठी सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. दिल्ली हिंसाचाराची निपक्ष तापास करण्याची हमी देखील त्यांनी सभागृहात बोलताना दिली.





