Chief Minister Yogi Adityanath । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलखोरांना आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना कडक संदेश दिला. लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, आपण राष्ट्राप्रती जबाबदार असले पाहिजे. कोणतीही मालमत्ता राज्याची नसते तर ती समाजाची असते. जर एखादी व्यक्ती सामाजिक संपत्ती नष्ट करत असेल तर त्याला थांबवा. जर ते खूप जास्त झाले तर तुम्ही ते तुमच्या मोबाईलवरून व्हायरल करू शकता. सरकार त्याचे पोस्टर्स लावून त्याच्याकडून उर्वरित वसुलीचे काम करेल” असे म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी यावेळी, “संपत्ती निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. सार्वजनिक मालमत्ता राष्ट्राची आहे. राष्ट्रीय मालमत्तेचा नाश करणारा व्यक्ती कायद्यासमोर गुन्हेगार असतो. अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल. असा धडा शिकवला जाईल की भविष्यात ते कायदा हातात घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील.” असे म्हणत त्यांनी यावेळी कडक इशारा दिला. Chief Minister Yogi Adityanath । १२ जून रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात विविध बोर्डांच्या हायस्कूल आणि इंटरमिजिएट परीक्षा २०२५ मधील टॉपर विद्यार्थ्यांना सन्मानित केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. मुख्यमंत्र्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना १ लाख रुपयांचा धनादेश, टॅबलेट, प्रशस्तिपत्र आणि पदक देऊन गौरव केला. याआधी, त्यांनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजनांची पायाभरणी केली, ज्यामध्ये उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषद, लखनऊ आणि माध्यमिक संस्कृत शिक्षण संचालनालय, नवीन इमारत यांचा समावेश आहे. Chief Minister Yogi Adityanath । हेही वाचा अमेरिका-चीनमध्ये ‘रेयर अर्थ करार’, पण भारतासाठी संकट ; ऑटो इंडस्ट्रीसाठी धोक्याची घंटा