इंचभर जमीन सोडणार नाही; चिन्यांचा कांगावा सुरूच
Updated On:

नवी दिल्ली – सीमेवर असणाऱ्या तणावास भारतच कारणीभूत असल्याचा कांगावा करत आम्ही आमची एक इंचही भूमी सोडणार नाही, असे निवेदन चीन सरकारने प्रसिद्धीस दिले आहे.
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वी फेंघी यांच्यात चर्चा झाल्यानंतर काही वेळातच चीनने हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
आश्चर्याचा भाग म्हणजे चीननेच चर्चेची विनंती राजनाथ सिंह यांच्याकडे केली होती. दोन्ही देशांत तणाव निर्माण झाल्यानंतर झालेली ही पहिलीच भेट होती.
भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर सध्या असणाऱ्या तणावाची कारणे आणि सत्य एकच आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी भारतावर आहे. चीन आपली एक इंचही जमीन सोडणार नाही आमच्या फौजा देशाचे सार्वभौमत्व आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी दृढनिश्चयी आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.





