पुणे जिल्हा | वाढदिवस साजरा करणार नाही ; जुन्नर तालुक्यातील दु:खद घटनां

नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.
दरवर्षी आमदार अतुल राजश्री वल्लभ बेनके यांचा मंगळवारी (दि. 23) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बेनके परिवार व कार्यकर्ते आनंदाने वाढदिवस साजरा करीत असतात; परंतु काही दिवसांपूर्वी पितृछाया हरपल्यामुळे व नुकतेच बेनके कुटुंबाचे जवळचे स्नेही कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापतीधोंडीभाऊ पिंगट, शिवाजीराव हडवळे,
सामाजिक कार्यकर्ते राजु चव्हाण, खामुंडी गावचे सरपंच वनराज शिंगोटे, ज्येष्ठ पत्रकार भरत अवचट यांचे निधन झाल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचे आमदार बेनके यांनी ठरविले आहे. परंतु पूर्व नियोजित जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांना मदत असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आमदार अतुल बेनके सदिच्छा स्विकारण्यासाठी मंगळवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 14 नंबर (येडगाव, ता. जुन्नर) येथील ब्लुमिंग डेल विद्यालयात उपलब्ध असणार आहेत. यावेळी कुठल्याही प्रकारचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू आणू नयेत. भेटवस्तू द्यायचीच असेल तर वह्यांच्या स्वरूपात आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





