Naisa Devgan : बॉलीवूड अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी ‘माँ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. लवकरच हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे काजोलची मुलगी नीसा देवगण लवकरच बॅालीवूड डेब्यू करणार असल्याच्या चर्चां रंगू लागल्या आहेत. सुरू असलेल्या चर्चांवर काजोलने स्पष्टीकरण देत एकाच वाक्यात उत्तर दिले आहे. नुकत्याच्या फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत काजोलने तिची मुलगी नीसा देवगणच्या अभिनयातील रुचीबाबात भाष्य केले आहे. अभिनेत्रीला विचारण्यात आले की मुलीला चित्रपटांमध्ये आणण्याचा विचार आहे का? यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, ‘नाही, मला वाटत नाही की ती हे करेल, तिला चित्रपटांमध्ये अभिनय करण्यात अजिबात रस नाही, असे उत्तर काजोलने दिले आहे. मला माझ्या कुटुंबातील सर्व मुले खूप आवडतात. मला असं वाटत की त्यांना जे हवे आहे त्यांने ते करावे, असे म्हणत तिने निर्णय घेण्याचे सर्वाधिकार तिच्या मुलीवर सोपवले आहेत. यामुळे नीसा बॅालीवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना फुलस्टॅाप लागला आहे. मात्र, नीसा आगामी काळात फिल्म इंडस्ट्री हे करिअर म्हणून निवडणार का हे पाहावे लागणार आहे. माझ्या मुलांना माझे चित्रपट आवडत नाहीत, कारण मला त्यात रडावे लागते आणि त्यांना त्यांच्या आईला मोठ्या पडद्यावर रडताना पाहणे आवडत नाही. मला रडताना पाहून नीसा आणि युग खूप घाबरतात, असे देखील काजोलने या मुलाखती दरम्यान सांगितले आहे. काजोल तिच्या आगामी माँ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मोठ्या ब्रेकनंतर आगमन करणार आहे. २७ जून २०१५ रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. हेही वाचा: प्रशांत किशोर यांचा पंतप्रधान मोदींवर मोठा हल्ला ; सांगितला बिहार भेटी मागील ‘हेतू’