प्रशांत किशोर यांचा पंतप्रधान मोदींवर मोठा हल्ला ; सांगितला बिहार भेटी मागील ‘हेतू’

Prashant Kishor on Prime Minister। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत. सिवानमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यांच्या याच दौऱ्यावरून आता जन सूरजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींवर मोठा हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर यांनी यावेळी, “पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच येत नाहीत. यापूर्वीही आम्ही सांगितले आहे की निवडणुकीदरम्यान पंतप्रधान एकदा नाही, पाच वेळा नाही तर १० वेळा येतील, पण ते बिहारसाठी येत नाहीत, ते बिहारच्या कल्याणासाठी येत नाहीत, ते बिहारच्या विकासासाठी येत नाहीत, ते भाजप आणि एनडीएसाठी मते मागण्यासाठी येत आहेत.” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.
प्रशांत किशोर यांनी यावेळी,”ते बिहारच्या लोकांना काय देणार किंवा नाही हा भविष्याचा प्रश्न आहे, परंतु हे खरे आहे की पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाचा खर्च बिहार सरकार उचलत आहे. बिहारचे लोक पैसे देत आहेत. मधौरा येथील लोकोमोटिव्ह कारखान्याचा प्रश्न आहे, तो कारखाना आधीच तेथे आहे. मधौरा याठिकाणी साखर कारखाना आहे, आपण त्यावर बोलले पाहिजे. मधौरा एक औद्योगिक शहर होते, आपण त्यावर बोलले पाहिजे.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पीकेने स्थलांतर आणि रोजगारावर प्रश्न उपस्थित Prashant Kishor on Prime Minister।
प्रशांत किशोर यांनी यावेळी, “गेल्या १०-१२ वर्षांपासून लोक घोषणा करत असल्याचे पाहत आहेत पण काहीच घडत नाही. पंतप्रधानांनी बिहारमधील मुलांचे स्थलांतर कधी थांबेल हे सांगावे? किमान इतके कारखाने कधी सुरू होतील की बिहारमधील लोकांना १० हजार रुपयांसाठी बाहेर जावे लागणार नाही?” असा सवाल उपस्थित केला.
बिहारमधील लोकांचे स्थलांतर थांबले पाहिजे Prashant Kishor on Prime Minister।
जन सूरजचे संस्थापक म्हणाले, “ज्या दिवशी मोदीजी गुजरातमध्ये ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने बिहारमध्ये बोलतील, त्या दिवशी बिहारमधील लोक दखल घेतील. पंतप्रधान मोदी दिल्लीत बसतील किंवा बिहारमध्ये येतील, येथील लोकांना एकच आशा आहे की गेल्या १५ वर्षांपासून आपण मोदीजींच्या नावाने मतदान करत आहोत. बिहारमधून ३० हून अधिक खासदार पाठवण्यात आले आहेत. देशातील सर्वात गरीब आणि मागास राज्य असलेल्या बिहारची परिस्थितीही बदलावी या आशेने त्यांना पाठवण्यात आले आहे. येथेही मुलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा. फक्त गुजरात आणि महाराष्ट्रात कारखाने सुरू होऊ नयेत. आपल्या मुलांनी गुजरात आणि महाराष्ट्रात जाऊन मजूर बनू नये. बिहारमधील लोकांची ही अपेक्षा आहे. बिहारमधील लोकांचे स्थलांतर थांबले पाहिजे.”





