Nana Patekar : ‘खाशाबा’मध्ये नाना पाटेकर ‘या’ भूमिकेत झळकणार? मोठी अपडेट समोर
Nana Patekar : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ हा चित्रपट भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे.

Will Nana Patekar star in the ‘Khashaba’ movie? : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रपटांबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘खाशाबा’ चित्रपटात नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीच्या व्हिडिओनुसार, नाना या चित्रपटाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘खाशाबा’मध्ये नाना पाटेकर कोणती भूमिका साकारणार?
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ हा चित्रपट भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदकविजेते कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर या चित्रपटात खाशाबा जाधव मोठे असतानाच्या भूमिकेत दिसू शकतात.
या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. टीझरमध्ये खाशाबा जाधव यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नसल्याने त्यांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपट होणार प्रदर्शित?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘खाशाबा’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा सिनेमा १ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि वैभव मांगले यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
कोण होते खाशाबा जाधव?
खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून भारताला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय क्रीडा इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले. त्यांचा संघर्ष, जिद्द आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावणारा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी ‘खाशाबा’ या चित्रपटातून मिळणार आहे.
Someshwar Election : तो निर्णय पडला महागात! पुरुषोत्तम जगताप यांच्या पराभवाचे कारण…






