मृणाल दुसानिस सुरू करणार नवा व्यवसाय? ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Mrunal Dusanis | मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून घराघरात पोहचली. 2016 मध्ये तिने लग्नगाठ बांधली. त्यानंतर मृणाल नवऱ्यासोबत अमेरिकेला शिफ्ट झाली. ज्यानंतर कलाविश्वापासून ती दुर गेली. मात्र मार्चमध्ये नवरा नीरज आणि आपल्या गोड लेकीसह मृणाल भारतात परतली.
तिच्या कमबॅकनंतर तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले होते. लवकरच मृणाल ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अशातच मृणालने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Mrunal Dusanis |
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये एका जागेचं इंटिरियर डिझायनिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “लवकरच काहीतरी नवीन घेऊन येतोय…तुम्ही गेस करू शकता का?”असे तिने लिहिले आहे. तसेच कॅप्शनच्या खाली “लॉन्चिंग सून’, ‘नवीन उपक्रम’, ‘कमिंग सून’, ‘स्टे ट्यून” असे टॅग्ज तिने वापरले आहेत. त्यामुळे मृणाल नवीन व्यवसाय सुरू करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. Mrunal Dusanis |
दरम्यान, मृणाल ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’सह ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये देखील पाहायला मिळाली.
हेही वाचा:





