रायगड : दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच शरद पवार गटावर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या प्रवेशासाठी ‘मुहुर्त’ ठरवल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात हलचल वाढली आहे. शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजीव खरे हे पहिल्यापासूनच शिंदे सेनेची जवळीक साधून होते. भरत गोगावले म्हणाले कि, “जेव्हा दोन राष्ट्रवादी एकत्र येतील, तेव्हा राजू खरे त्यांचा निर्णय घेतील,” अशी प्रत्यक्ष घोषणा त्यांनी केली. या शब्दांनी शिंदे सेनेत मोठी जागृती निर्माण झाली आहे, कारण पक्षीय विस्तारादरम्यान राजू खरे यांचा समावेश शिंदे गटाला मोठं बळ देऊ शकतो. शिंदे गटाने आधीच काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा समावेश केला आहे. नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? भरत गोगावले म्हणाले, आम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांना बोलावू, असे स्पष्ट संकेत काल (11 जून) तयतानी दिले आहेत. त्यामुळे पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. जेव्हा दोन राष्ट्रवादी एकत्र येतील तेव्हा राजू खरे त्यांचा निर्णय घेतील, असे सांगत राजू खरेंच्या प्रवेशाबाबत भरत गोगावले यांनी मुहूर्तही जाहीर केला आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का देत जगताप यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्याची राजकारणात चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्याच नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिन्हावर करमाळा नगरपालिकेवर, पंचायत समितीवर आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकवणार असल्याचा निर्धार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार असल्याची शक्यता आहे.