उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमासाठी बोलावणार का ? गोपिचंद पडळकरांनी दिलं थेट उत्तर म्हणाले…

Gopichand Padalkar | अहिल्यादेवीसारखं काम देशात कुणाचं नाही. अहिल्यादेवीच्या पुण्यतिथीचे काम जगभरात सुरू आहे. अहिल्यादेवीना अभिवादन कुणी केलं नसेल असं करणार म्हणून मे महिन्यात पुण्यात 50 अहिल्या ढोल एकाच वेळी वाजवून अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले जाणार आहे.
याविषयीची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत याविषयी बोलत होते. तसेच या कार्यक्रमासाठीच्या निमंत्रितांबद्दही त्यांनी सांगितली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमासाठी बोलावणार का? या प्रश्नावर पडळकर यांनी थेट उत्तर दिले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमासाठी बोलवणार का? असा प्रश्न पडळकर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी अजितदादा यांना बोलावणार नाही असे थेट उत्तर दिले. त्यांच्या या थेट उत्तरामुळे राजकीय वतुर्ळात चर्चांना उधान आले आहे.
पुण्यातील रेसकोर्स मैदानावर आमचा कार्यक्रम घेण्याचा विचार आहे. धनगरी ढोल आमचा आत्मा आहे. जगभरात असा रेकॉर्ड झाला नाही. ढोल वाजवणे शक्तीचा आणि भक्तीचा नाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पूर्ण वर्षभर होणार आहे. पुणे, मराठवाडा, खांन्देश या भागातून मोठ्या प्रमाणावर तरुण या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत, अशी माहिती पडळकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.





