Maharashtra Politics : काँग्रेस मविआतून बाहेर पडणार? वरिष्ठांना पाठवला प्रस्ताव, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
Maharashtra Politics : महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असा थेट प्रस्तावच स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे पाठवल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मतभेद उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) मध्ये नाराजी वाढली असून, पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेते वसंत मोरे यांनी शरद पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. “महाविकास आघाडीचा तिसऱ्यांदा विश्वासघात झाला आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केले,” असा आरोप त्यांनी केला. (Maharashtra Politics)
वसंत मोरे म्हणाले की, अंकुश काकडे यांच्या उमेदवारीबाबत आधीच सेटलमेंट झाल्याची माहिती मिळाली होती. “बारामतीतील भाऊबंदकी बारामतीतच करावी. ठाण्यात मदत केली म्हणून साताऱ्यात शिवसेनेला मदत करणार, अशी राजकीय देवाणघेवाण सुरू असेल तर त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार,” असेही ते म्हणाले. (Maharashtra Politics)
पुणे शहरात शरद पवार गटाचे केवळ तीन नगरसेवक असतानाही त्यांनी व्यापक आघाडीच्या हिताचा विचार करायला हवा होता, असे मत व्यक्त करत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. “पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी भूमिका मी वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : काँग्रेस मविआतून बाहेर पडणार? वरिष्ठांना पाठवला प्रस्ताव, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
महाविकास आघाडी कायम राहणार की नाही, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेईल, असे सांगतानाच मोरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये अंतर्गत समन्वय असल्याचा आरोप केला. घोडेबाजार झाला नाही, पण सेटलमेंट झाली आहे. प्रत्येक ठिकाणी भाऊबंदकीचे राजकारण सुरू राहिले तर महाविकास आघाडीचे मोठे नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला. (Maharashtra Politics)
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीतील या घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून, आगामी काळात या वादावर वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





